मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय

नागपूर दि.१३:: सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे अपहरण करणाऱ्या  संशयितांना अधोेरेखित करण्यासाठी धावपळ चालवली आहे. पायल सुधीर टेंभुर्णे (वय १३) आणि तनिशा चरणदास टेंभुर्णे (वय १४) अशी बेपत्ता मुलींची नावे आहेत. या दोघी चुलत बहिणी असून, सदरमध्ये मोहननगर, खलाशी लाईनमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. दुकानातून रिबीन घेऊन येतो असे सांगून या दोघी १६ फेब्रुवारीला घराबाहेर गेल्या. रात्र झाली तरी त्या परतल्या नाही, त्यामुळे पालकांनी त्यांची शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. अभ्यासात हुशार असलेल्या या दोघी सोबत घरून निघून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांचे कुणीतरी पूर्वनियोजित पद्धतीने अपहरणच केले असावे, असा दाट संशय आहे. पालकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यात अपहरणाचा संशय व्यक्त केला आहे. सदरचे ठाणेदार सुनील बोंडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या मुलींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.

Share