विनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत

0
10
गोंदिया,दि.१३ः- गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंगपूरा मुर्रीतील इयत्ता ३ री च्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सदर मुलीला मारहाण करुन संबधित प्रकरणाला दाबण्याच्या प्रयत्न केल्याची माहिती मिळताच नागरिकांनी सोमवारला शाळेत आंदोलनात्मक पवित्रा घेतला.दरम्यान सदर प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले,कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवाने,शिक्षणाधिकारी उल्हास नरड, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश रहमतकर यांनी शाळेत धाव घेत प्रकरणाची सहनिशा केली.आणि सदर शिक्षकाला निलqबत करण्याचे आश्वासन दिले होते.त्या प्रकरणावर मंगळवारला जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी मुद्दा उपस्थित करीत सदर प्रकरणात आरोपी शिक्षकासह प्रकरण दडपून ठेवणारे मुख्याध्यापक आनंद पुंजे यांच्या निलंबनाची मागणी केली.यावर सर्वच सदस्यांनी आक्रमक भुमिका घेत मुख्याध्यापकाच्या निलंबनाच्या मागणीला पाqठबा दिल्याने अखेर शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी मुख्याध्यापक पुंजे यांना निलqबत करण्यात येत असल्याची घोषणा सभागृहात केली.
मिळालेल्या माहितीनुसार या शाळेतील ३ रीची शिक्षिका गेल्या एक महिन्यापासून रजेवर असल्याने तो वर्ग शिक्षक लक्ष्मीचंद हरिणखेडे यांच्याकडे देण्यात आला.त्यादरम्यान फेबुवारी महिन्यात शाळेतील झुल्यावर सदर पिडीत मुलगी झुलत असतानाच झुला तुटला.त्यावर सदर शिक्षकांना रागावत पिडीत मुलीला वर्गखोलीत नेऊन बंद करुन मारहाण केली तसेच कपडे काढून अश्लिलप्रकार केला.सदर प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास मारण्याची धमकी दिल्याने सदर मुलीने कुणालाही माहिती दिली नाही.परंतु ९ मार्चला सदर वर्गशिक्षिका रुजु होताच मुलीने त्या शिक्षिकेला माहिती दिली.त्यानतंर पिडीत मुलीचा कुटुबियांना माहिती होताच त्यांनी सदर शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करीत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर भादविच्यां कलम ३५४(अ),(ब) सहकलम ८,१०,१२ बाललैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला.याप्रकरणात मुख्याध्यापक आनंद पुंजे व केंद्रप्रमुख कटरे यांची सदर प्रकरणात हयगयकेल्याप्रकरणी तत्काळप्रभावाने स्थानातंरण करण्यात आले आहे.