मुख्य बातम्या:
अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा# #अपघाताला आळा घालण्यासाठी अतिक्रमणे हटविण्यासोबतच नियमांची अंमलबजावणी करा- लक्ष्मीनारायण मिश्रा# #रविवारी निरीक्षक प्रमाणित शाळा व तत्सम पदे परीक्षा# #अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवारांसाठी सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण# #२१ डिसेंबरला गोरेगाव येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा# #पदाच्या दुरुपयोगप्रकरणी सरपंच व उपसरपंच पायउतार# #सिहोरा-बपेरा परिसरातील वाळू घाटावर वाळूमाफियांचे गुंडाराज# #शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद‘# #ओबीसींना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्या

देशपांडेना गोंदियाचा मोह आवरेना;बांधकामचा मस्करे लपामध्ये तळ ठोकून

गोंदिया,दि.१४ :-गोंदिया जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभाग तसा नेहमीच चर्चेतला विभाग राहिला आहे.या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याच्या दुर्लक्षामूळेच म्हणा की स्वतःला मी भाऊ तसा नव्हे सांगण्याच्या भूमिकेमुळे या विभागातील कर्मचारी अधिकार्यावर नियंत्रण राहिलेच नाही.गोंदिया लघु पाटबंधारे  उपविभागातंर्गत येत असलेल्या गोरेगाव तालुक्यातील मोहाडी,चोपा,तेढा भागातील कामे सांभाळणारे शाखा अभियंता विकास देशपांडे यांची मे २०१७ मध्ये प्रशासकीय बदली सालेकसा लघुपाटबंधारे उपविभागात झाली.परंतु त्यांनी बदलीनंतरही गोरेगाव तालुक्यातील काम करण्याचा मोह अद्यापही सोडलेला नाही.तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकाला आमगावच्या लपा उपविभागात ठेवून त्याच्याकडून साईटवरील कामे करण्यास मोकळीक दिल्याने कार्यकारी अभियंत्याच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

शाखा अभियंता देशपांडे यांना गोंदिया येथून १ जून २०१७ ला कार्यमुक्त करण्यात आले.त्यानतर सालेकसा येथे रुजूही झाले.परंतु देशपांडे यांनी रुजु झाल्यानंतर शाखा अभियंता म्हणून जे काम त्याठिकाणी करायला हवे होते,ते एकही काम अद्याप केलेले नाही.उलट उपविभागीय अभियंता सोरले हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार उलट कार्यकारी अभियंता विश्वकर्मा यांनी देशपांडेना सोपवितांना त्यांनी शाखा अभियंता म्हणून त्या उपविभागात जबाबदारी स्विकारली की नाही याचा तपासच केल्याचे दिसून येत नसल्याचे उघडकीस आले आहे.उलट गोंदिया उपविभागातून बदली झाल्यानंतरही आजही ते गोंदियाच्या उपविभागीय कार्यालयात येऊन गोरेगाव तालुक्यातील कामांचे इस्टिमेट तयार करणे आदी काम करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.एकीकडे गोंदियातून बदली झालेली असताना सालेकास येथे मुळ आस्थापनेच्या कामाला हात लावलेले नाही.परंतु गोंदिया उपविभागात येऊन देशपांडे बिनधास्त कार्यकारी अभियंत्याच्या आशिर्वादाशिवाय काम करुच शकत नसल्याची चर्चा आहे.त्याचप्रमाणे सालेकसा येथेच सुरवातीपासून कार्यरत असलेले स्थापत्य अभियात्रिकी सहाय्यक शैलेंद्र मेश्राम यांची पदोन्नतीने कनिष्ठ अभियंता या पदावर त्याच ठिकाणी नियुक्ती करण्यात आली.वास्तविक पदोन्नतीने इतर ठिकाणी नियुक्ती व्हायला हवी होती.परंतु तसे करण्यात आले नाही. मेश्राम यांच्या कामकाजाच्या अनेक तक्रारी असतानाही त्याच ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी का नियुक्ती केली? हा प्रश्न तालुक्यात चर्चेचा ठरला आहे

बांधकामचा मस्करे लपामध्ये तळ ठोकून
जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग आमगाव येथील कनिष्ठ सहायक के.एम.मस्करे यांना तत्कालीन सीईओ डी.बी.गावळे यांच्या १ फेबु्रवारी २०१६ च्या पत्रानुसार आमगाव तालुक्याचा अभ्यास असल्याने त्यांची प्रति नियुक्ती तलावाची देखरेख पानसारा वसूली संबंधाने नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासून ते त्या ठिकाणी तळ ठोकून बसले असून आमगााव तालुक्याव्यतिरिक्त सडक अर्जुनी तालुक्यातील मग्रारोहयो,शेततळे,मागेल त्याला विहिर आदी कामे अभियंता म्हणून स्वतःच ठेकेदारी सुध्दा करीत असल्याची चर्चा आहे. वास्तविक मंगळवार व गुरुवार हे दोनच दिवस ठरविलेले असताना मस्करे मात्र पूर्ण आठवडा काम करीत असून तत्कालीन सीईओ गावळे यांच्या पत्राला मस्करेंनी केराची टोपली दाखवत आपली दुकान थाटल्याची चर्चा आहे. कामांचे मोजमापासह सर्वच कामे जी शाखा अभियंता करतो ती कामे करण्याचा सपाटा लावला आहे.एकीकडे जि.प.बांधकाम विभागात प्लंबर व यांत्रिकीच्या लोकांना टेंडरची कामे दिली जात आहेत.तर दुसरीकडे बांधकामचाच कर्मचारी लपा विभागात जाऊन दुसरे काम करीत असल्याचे चित्र आहे.मस्करेंना लपा मध्येच टिकवून ठेवण्यासाठी जि.प.सदस्यांचा नक्कीच पाठपुरावा असावा अशी चर्चा आहे.

Share