राष्ट्रवादी काँग्रेसचा वाशिम शहरात युवा आक्रोश मोर्चा

0
11

वाशिम,दि.14 – विविध पातळीवर विद्यमान सरकार अपयशी ठरले असून, अच्छे दिनचे आश्वासनही फोल ठरल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने १४ मार्च रोजी वाशिम शहरात युवा आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केले.

 बरोजेगारी, सरकारची खोटी आश्वासने, बंद असलेली शिष्यवृत्ती व विद्यार्थ्यांना होत असलेला मनस्ताप, मोदी सरकारच्या दोन कोटी रोजगाराचे काय झाले, एमपीएससीच्या कमी केलेल्या जागा पुन्हा वाढविण्यात याव्या, जिल्हा भरती प्रक्रियेत निकष बदलून कंत्राटी रोजगार हा कायम करण्यात यावा, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव द्यावा, गारपिटग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी, शेतकºयांना सरसकट वीजबील माफ करावे, पाणीटंचाई, चाराटंचाईसंदर्भात चारा डेपो सुरू करावा, परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीत सामावून घ्यावे, बोंडअळीग्रस्त शेतकºयांना लवकर आर्थिक मदत द्यावी, अतिक्रमणधारकांना त्वरीत कायम पट्टे द्यावेत, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने वाशिम येथे युवा आक्रोश मोर्चा काढला. १४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. पाटणी चौक, अकोला नाका, जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी संग्राम कोते पाटील यांनी ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाºया विद्यमान सरकारकडून  प्रत्यक्षात सर्वांचीच निराशा झाली आहे, असे सांगत सरकारवर तोफ डागली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सभेला संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे, राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, राकाँ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शुभदा नायक, माजी जिल्हाध्यक्ष तथा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप जाधव, माधवराव अंभोरे यांच्यासह राकाँचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, राकाँच्या विविध सेल व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींची बहुसंख्येने उपस्थिती होती.