मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018

0
31
पुणे,दि.14ः- मिसेस भारत आयकॉन्च्या उत्तुंग यशानंतर श्री.अखिल बन्सल रॉयल हेरिटेजचे अध्यक्ष हे मिस आणि मिसेस भारत आयकॉन्चा दुसरा सिझन घेऊन येत आहेत.हा प्रतिष्टीत आणि अद्वितीय असा कार्यक्रम राहणार आहे. मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 बद्दल सांगताना शीतल अरपल यांची पुणे  दिग्दर्शक  म्हणून बोर्डावर नियुक्ती झाल्याची माहिती दिली. तसेच पुण्यातील ऑडिशन या त्यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. पुण्यातील फॅशन आणि मीडिया क्षेत्रातून खूप  चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मिस आणि मिसेस भारत आयकॉन 2018 चे पुणे दिग्दर्शक शीतल अरपल आणि फॅशन जगतातील प्रसिद्ध तज्ञ लॉव्हेल प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे ऑडिशन्स प्रत्येक शहरात होणार असून मुंबई मध्ये अंतिम सोहळा होईल. मिस आणि मिसेस भारत आयकॉन ही प्रत्येक भारतीय / NRI मुली आणि लग्न झालेल्या महिलांसाठी खुली आहे.मिस आणि मिसेस भारत आयकॉनचे स्पर्धक संपूर्ण जगातून घेतले जातील. हा प्रत्येक भारतीय महिलेसाठी उत्सवच आहे.कारण ती तिच्या आयुष्यात अनेक भूमिका बजावते.मुलगी/ बहीण/आई/बायको आणि बहू प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व आहे. महिला या महत्वाच्या भाग आहेत कारण त्या घर, तिचे नातेवाईक आणि करियर या सगळ्यांचा अचूक समतोल साधतात तिची आयुष्यभर कसरत सुरू असते .ज्या महिला घरी असतात त्यांना देखील घरातील कामे आणि इतर अशा एक ना एक जबाबदाऱ्या रोज पार पाडाव्या लागतात आज महिला बँकेत अधिकारी ,पत्रकार,पोलीस अधिकारी वैमानिक,कार्यकारी,सामाजिक आणि गृहिणी अशा अनेक कामे करताहेत,ज्यात त्यांना मुदतीच्या मागणीनुसार जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. मग ते घर असो वा कामाचे ठिकाण.मिस आणि मिसेस भारत आयकॉन अशा सर्वांना संधी उपलब्ध करून देत आहे. ज्यांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये चमकण्याची इच्छा किंवा स्वप्न आहे. तर आजच तुम्ही मिस आणि मिसेस भारत आयकॉनच्या स्पर्धेसाठी नोंदणी करा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
  मिस आणि मिसेस भारत आयकॉन स्पर्धेचे परीक्षक भारतातील नावाजलेल्या सेलेब्रिटी असतील. आमचे ध्येय आहे की,उदयाचा भविष्यकाळ हा लोकांना उत्तम राहणीमान आणि निसर्गाचे भरलेला परिसराला आनंद हा अत्याधुनिक सुविधांनी घेता यावा,आमचे ध्येय आहे की ,स्वच्छ भारत अभियान आणि मुलगी वाचवा.