मुख्य बातम्या:

वाघाच्या हल्ल्यात आणखी एक शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर,दि.14:- पट्टेदार वाघांनी चंद्रपूर जिल्हयाला देश पातळी सोबत जागतीक स्तरावर प्रसिध्दी झोतात आणले. त्या वाघांचे अस्तीत्व टिकविण्यासाठी सर्वतोवरी प्रयत्न शासन स्तरावरून केले जात आहे. मात्र मनुष्यप्राण्यावर जिल्हयात वाघांचे हल्ले होत असलेल्या घटना बघता वनपरिक्षेत्रालगत असलेल्या गावकऱ्यांचा जीव वाघाच्या मुठीत असल्याचे चित्र डोळयासमोर दिसून येत आहे.त्यातच सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या किन्ही येथील शेतकरी काल शेतात गेले असता या शेतकऱ्यावर वाघाने ह्ल्ला करून ठार केल्याची घटना समोर आली आहे. सायंकाळी मुलगा शेतावर उशीरापर्यत वडील घरी न आल्याने शोधण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला. वाघाच्या ह्ल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव मुकुंदा भेंडाळे (५५) असे असून त्यांचे पश्चात पत्नी व मुलगा आहे.

Share