मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

वर्धा,दि.14 : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली.
प्रभू यांनी गांधी दर्शन आणि राष्ट्रभाषा हिंदीत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचा जन्म केरळ येथे २९ मे १९४७ ला झाला. गांधीजींच्या जन्म शताब्दी वर्षात त्यांनी सर्वोदय आंदोलनात सहभाग घेतला होता. तसेच सर्वोदयाचे अग्रणी नारायण देसाई यांच्या नेतृत्वात त्यांनी शांती सेनेचे प्रशिक्षण घेतले आहे. केरळ येथे युवा शांती सेना संयोजक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. १९७५ आणीबाणीत त्यांना कारावास भोगावा लागला. १९७७ ला लोक नायक जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या छात्र युवा संघर्ष वाहिनीतही त्यांनी काम केले आहे. गांधी विचारांवर आधारीत पुर्णोदय बुक ट्रस्टचे ते उपाध्यक्ष आहे. तसेच केरळ येथे गांधी शांती प्रतिष्ठानचे युवा समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. यासह सर्व सेवा संघाचे मंत्री आणि विश्वस्त म्हणून ते कार्य करीत आहेत.

Share