मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

युपी,बिहारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले!

लखनऊ/पटणा(वृत्तसंस्था),दि.14– उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित गोरखपुर आणि फुलपुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी-बसपाच्या युतीने भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघात सपाचे दोन्ही उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला आहे.फुलपूर लोकसभा मतदारसंघात सपा-बसपा आघाडीचे नागेंद्र सिंह पटेल यांनी 59 हजार 613 मतांनी विजय मिळवला आहे.

गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे प्रवीणकुमार निषाद यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे उपेंद्र दत्त शुक्ल यांच्यावर 25 हजार मतांची आघाडी घेतली आहेत. 22 व्या फेरीपर्यंत प्रवीण निषाद यांना 3 लाख 34 हजार 463 मते तर भाजपाचे उपेंद्र शुक्ला यांना 3 लाख 8 हजार 593 मते मिळाली आहेत.

पाटणा- बिहारमध्ये एक लोकसभा व दोन विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपच्या आघाडीला मोठा धक्का बसला आहे. आररिया लोकसभा मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) उमेदवार सर्फराज आलम यांनी मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे उमेदवार प्रदीप सिंह यांच्यावर आलम यांनी 62 हजारांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे.आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, सर्फराज आलम यांना 3 लाख 33 हजार 50 मते मिळाली आहेत. तर भाजपचे प्रदीप सिंह यांना 3 लाख 9 हजार 863 मते मिळाली आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार तस्लीमुद्दीन यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

Share