नागपुरात लवकरच सुरू होणार विमानांची दुरुस्ती

0
14

नागपूर – मिहानला चांगले दिवस येत आहेत. एअर इंडियाने बोइंगच्या सहकार्याने मिहान-सेझ प्रकल्पामध्ये उभ्या केलेल्या विमानांची देखभाल आणि दुरुस्ती करणारा ‘एमआरओ’ पूर्णत्वाला गेला आहे.
पुढच्या आठवडय़ात दिल्लीत होणा-या उच्चस्तरीय बैठकीत या ‘एमआरओ’च्या उद्घाटनाची तारीख ठरेल. आधीच हा ‘एमआरओ’ दोन वष्रे रखडला होता. देशात सत्तांतरानंतर या कामाला वेग आला. सरकारी पातळीवरही हालचाली झाल्या.
दिल्लीचे अधिकारी नुकतेच व्यवस्था पाहून गेले. सारे सुरळीत पार पडले तर येत्या मार्चच्या आत नारळ फुटलेला असेल. विमानतळावर उतरलेले विमान ‘एमआरओपर्यंत आणण्यासाठी टॅक्सी वे’ची आवश्यकता असते. त्याचेही बांधकाम पूर्ण झाले आहे.
देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचे महत्त्व या सोयी सुरू झाल्यानंतर वाढणार आहे. जगभरातील विमानांनी नागपूरचा वापर ‘इंधन थांबा’ म्हणून वापरावा, अशी मिहान प्रकल्पामागील प्रेरणा साकार होताना दिसत आहे. मंगळवारी चार आंतरराष्ट्रीय विमाने दिवसभरात नागपुरात उतरली आणि इंधन भरून उडाली. यातले एक विमान अबुधाबीहून मंडालेकडे निघाले होते.