नेर तालुक्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेची सुरूवात

0
55

👉🏼 मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो राजु केंद्रे यांचा पुढाकार

नेर दि.१६ः:  राज्यातील धरणे व जलसाठ्याच्यासाठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणांतील गाळकाढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना हाती घेतलीआहे. महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत महाराष्ट्रभर २५० ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे, नेर मधील गटग्रामपंचायत इंद्रठाणा साठी मागील एक वर्षापासुन मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून इंद्रठाणा, मुकिंदपूर, फत्तापूर, पिंप्री (इजारा), पेंढारा, पारधीबेडा या सहा गावांत कार्यरत आहे. सुरूवातीला सुक्ष्म नियोजन करुन सर्वच गावांतील महत्त्वाचे प्रश्न समोर आणले व ग्रामपरिवर्तनाचा ध्यास घेतला, पारधीबेड्यात सुरूवातीला एक महिना तळ ठोकुन बचतगटाच्या माध्यमातून उद्योग, मीटर जोडणी, पाण्याचा
प्रश्न, शाळा डिजिटल असो व नवोप्रकमाच्या माध्यमातून सहा अंगणवाडी सहा शाळेंवर विशेष भर, अशा अनेक नाविण्यपुर्ण पद्धतीने उपक्रम राबविले, शौचालयाच्या मोहीमे अंतर्गत ग्रामपंचायत मध्ये दोन महिन्यात १५० पेक्षा जास्त शौचालय बांधण्यात आले. महत्त्वाचे काम शेतीसमृद्धी व सिंचनांचा प्रश्न त्याचाच भाग म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारचे काम प्राथमिकता ठेऊन हाती घेण्यात आले.

ग्रामपंचायत अंतर्गत इंद्रठाणा व मुकिंदपुर या दोन्ही गावात असलेल्या पाझर तलावातीलगाळ उपसण्याच काम हाती घेण्यात आले अाहे. सुरवातीला मुकिंदपूर गावातील पाझर तलावापासून करण्यात आली आहे, आतापर्यंत १२०० ब्रास गाळ काढण्यात आला आहे.तलावातील गाळ काढण्यासाठीलागणाऱ्या मशीनची व्यवस्था घाटंजी येथील दिलासा संस्थेतर्फे करण्यात आली असून गायत्री महिला बहूउद्देशीयसंस्थेने सहकार्य केले. गावातील तलावांमध्ये अधिक प्रमाणात गाळ साठत असून, त्यातील पाणी साठवण्याची क्षमता कमी होत असल्याने गावकरी अनेक दिवसांपासून गाळउपसण्याची मागणी करत होते व लागेल ते सहकार्यकरण्याची तयारी त्यांनी दर्शविली  होती त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम विकास फेलो राजू केंद्रे यांनी या विषयावर भर देऊन हे काम यशस्वी करण्यासाठी सलग दोन महिने मेहनत घेतली.

सोनखताच्या दर्जाच्या या गाळामुळे शेतक-यांच्या जमिनीची सुपीकता नक्कीच वाढेल व परिणामी शेतीमाल उत्पादकता नक्कीच ह्यामुळे वाटणार आहे सोबतच ह्या तलावांतील गाळ काढल्याने येथील पाण्याची पातळी वाढणार आहेच सोबतच नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये संपणारे तलावातील पाणी ह्या माध्यमातून एप्रिल/मे पर्यंत पुरेल, जनावरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, ४५ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ काढण्याची ही मोहीम पहिल्यांदाच हाती घेण्यात आली अाहे अशी बोलकी प्रतिक्रिया शेतकरी बांधवांनी दिली आहे. मुकिंदपुर व इंद्रठाणा दोन्ही पाझर तलावांच्या ह्या मोहीमेमुळे पंचक्रोशीतील १२-१५ गावांतील १२५-१५० शेतकरी बांधव फायदा घेतील १०,००० ब्रास गाळ काढून शिवारात टाकण्यात येईल असा अंदाज आहे.ह्या सर्व प्रक्रियेमध्ये  जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी दारव्हा, तहसीलदार नेर, सिंचन विभाग पदाधिकारी व दिलासा संस्थेचे पदाधिकारी यांचे  सहकार्य व मार्गदर्शन लाभले त्यामुळेच हे काम यशस्वी होत आहे असे मुख्यमंत्री ग्राम विकास फेलो राजु केंद्रे यांनी सांगितले.