नागरा तीर्थक्षेत्राच्या विकासाठी दोन कोटीचा निधी-आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश

0
10
गोंदिया,दि.16 : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नाने नागरा येथील शिव मंदिर परिसराच्या विकासाठी राज्य तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातंर्गत दोन कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. या दोन कोटींच्या निधीतून भक्त निवास, संरक्षण भिंत, शौचालय, सिमेंट, डांबर रस्ते, पाणी पुरवठा इत्यादी व्यवस्था करण्यात येणार आहे.
मागील काही दिवसांत आमदार अग्रवाल यांनी शासनाचे वास्तूविशारद तथा बांधकाम विभाग अधिकाºयांसोबत नागरा तीर्थक्षेत्र परिसराची पाहणी करून विकासकामांची समीक्षा करून आवश्यकतेनुसार २ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. त्याचीच फळश्रृती म्हणून २ कोटींच्या निधीला शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. शासनाकडून तीर्थक्षेत्र विकास निधी प्राप्त करण्यासाठी संबंधित तीर्थक्षेत्र ब गटाचा दर्जा असणे आवश्यक असून आ. अग्रवाल काही महिन्यांपूर्वी नागरा तीर्थक्षेत्राचा ब गटाचा दर्जा प्राप्त करवून दिला होता. नागरा येथील प्राचीन शिवमंदिर जिल्ह्यातच नव्हे तर, भंडारा, गोंदिया, बालाघाटसहीत मध्यभारतात प्रसिद्ध लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. त्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून आ. अग्रवाल या मंदिराच्या विकासासाठी आधीपासून प्रयत्नरत असून या मंदिर परिसरातील तलावाचे सौंदर्यीकरण, विद्युतीकरण अन्य कामे त्यांनी केली आहेत. ज्यावेळी आ. अग्रवाल नागरा परिसराची पाहणी केली. त्यावेळी त्यांचेसोबत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, रमेश लिल्हारे, पं.स.उपसभापती चमनलाल बिसेन,  पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, ओमप्रकाश भक्तवर्ती, सरपंच पुष्पा अटराहे, उपसरपंच अमृतलाल पतेह, दुर्गाप्रसाद धांडे, प्रकाश रहमतकर, सुरेंद्र गणवीर व अन्य साबां. विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरा येथील शिमंदिराच्या विकासासाठी आ. अग्रवाल यांनी दोन कोटींचा निधी शासनाकडून मिळवून दिल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.