राकॉंचा उपविभागीय कार्यालयावर ‘हल्लाबोल’

0
14

एटापल्ली दि.१६- तालुक्यातील सुरजागड पहाडीवरून अवैधरित्या होत असलेले उत्खनन व पर्यावरणाचा होत असलेला ºहास या विरोधात शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने  आज (दि.१६) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हल्लबोल मोर्चा काढण्यात आला.सदर हल्लाबोल मोर्चा स्थानिक राजीव गांधी हायस्कूल येथून काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, रायुकॉंचे प्रदेश अध्यक्ष संग्रामसिंह कोते पाटील, माजी जि. प. अध्यक्षा तथा विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्रीताई आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सुरजागड पहाडीवरील खदानीचे निर्णय तालुक्यातील ग्रामसभेच्या निर्णयानुसार घेण्यात यावे आणि सुरू असलेले उत्खनन त्वरीत बंद करण्यात यावे, ३१ मार्च २०१८ पर्यंत सर्व शेतकºयांचे सरसकट कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, तालुक्यातील संपूर्ण गावात, पाड्यात वीज, पाणी, आरोग्य आदी मुलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा, जबरानज्योत जमीनधारकांना तत्काळ पट्टे देण्यात यावे, अहेरी जिल्हा घोषित करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश होता.
या हल्लाबोल मोर्चात रायुकॉंचे जिल्हाध्यक्ष रिंकू पापडकर, एटापल्ली पं.स. च्या सभापती बेबीताई लेकामी, तालुकाध्यक्ष दौलत दहागावकर, राजू नरोटे, लक्ष्मण नरोटे, पंकज पुंगाटी, कैलाश कोरेत, लक्ष्मण नरोटे, शंकर करमकर, मारोती दहागावकर, केशव कंगाली, हरिदास टेकाम यांच्यासह राष्टÑवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.