भंडार्‍याची वैभवी महिला क्रिकेट संघात

0
10

भंडारा,दि.१७ः-: विदर्भ महिला क्रिकेट संघात भंडारा येथील वैभवी सोनवाने या किक्रेटपटूची एक दिवसीय व टी-२0 विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूर यु-२३ महिला क्रिकेट संघ सेंट्रल झोन क्रिकेट स्पध्रेकरिता निवड करण्यात आली आहे. छत्तीसगढ व जबलपूर, मध्यप्रदेशसाठी ती रवाना झाली आहे. वैभवी विद्यापीठ क्रिकेट खेळाडू असून ती ऑल इंडिया विद्यापीठ क्रिकेट स्पध्रेत नागपूर विद्यापीठातर्फे सुध्दा खेळली आहे.
वैभवी सोनवाने ही भंडारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन व पी.एस क्रिकेट अकादमीची खेळाडू असून पी. एस. क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. तिने आपल्या निवडीच्या यशाचे श्रेय आई लता उर्फ रेखा व वडील राम सोनवाने तसेच प्रशिक्षक प्रा. प्रकाश सिंह आदींना दिले आहे. वैभवीच्या कामगिरीबद्दल भंडारा जिल्हा क्रिकेट संघटनाचे अध्यक्ष मुकेश पटेल, उपाध्यक्ष विपीन पटले, डॉ. विकास ढोमने, सचिव प्रा.अशोक राजपूत, प्रा.प्रकाश सिंह, नरेश गुर्जर, प्रा. श्रृंगारपूरे, प्रदीप शर्मा, शैलेंद्र सिंग, राजपूत, रवी नागर, राजू देसाई, राहुल पाठक, कुमार आकरे, वसंत लाहोटी, भुषण उपाध्याय, जयंत गणेशे आदींनी अभिनंदन केले.