प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयात चित्रकला प्रदर्शन

0
11

गोंदिया,दि.१७ः-श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदियाद्वारा संचालित प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय गोंदिया येथे ८ व्या त्रिदिवसीय चित्रकला प्रदर्शन थाटात पार पडले. कला प्रदर्शनात प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाच्या विविध शाखेतील फाउंडेशन कोर्स, ए.टी.डी. तसेच जी.डी. आर्टच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याद्वारे रेखाटलेल्या मनमोहक चित्रांचे व निरनिराळय़ा कला गुणांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे उद््घाटन सई अभिमन्यू काळे यांच्याद्वारे करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, एच.एच. पारधी, अपूर्व मेठी, देवेश मिर्शा, महेंद्र बिसेन, महेश वालदे, डॉ. पंकज कटकवार, डॉ. निरज कटकवार, पद्मा कटकवार उपस्थित होते. मान्यवरांनी कला प्रदर्शनीचे निरीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतीबद्दल विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
ज्यामध्ये अविरल शर्मा, नम्रता बिसेन, बालचंद्र राऊत, अरफन कुरैशी, वैभव मेर्शाम, किरण बानेवार, पालेंद्र गावळ, शालिनी भांडारकर, सोनी फुलसुंगे, गुरुदास भेलावे, प्रीती पारधी यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेद्वारे स्मृतिचिन्ह तसेच प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, अभय गुरव, प्राचार्या कुमुदिनी तावाडे, वाय. आशा राव, मिनाक्षी महापात्रा, कुलदीप भौतिक, विणा कावळे, कृष्णा चव्हाण, निधी व्यास, विकास पटले, प्रमोद वाडी, शिल्पा सिंग, कल्याणी रहांगडाले, वर्षा सतदेवे, रुपकला रहांगडाले, राहुल रामटेके, दिव्यांशु जायस्वाल तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.