पुणे ATS कडून तीन बांगलादेशींना अटक

0
9

पुणे,दि.17(वृत्तसंस्था)- पुणे ATS कडून तीन बांगलादेशी नागरिकांना आज शनिवारी अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात दहशतवादी कारवायांमुळे बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेचे सदस्य आहेत. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे.

एटीएसच्या माहितीनुसार, दहशतवादी घटना रोखण्यासाठी देशात बेकायदा घुसखोरी करणाऱ्या परदेशी नागरिकांवर एटीएसची करडी नजर असते. तसेच या लोकांचा कोणत्याही दहशतवादी कारयावांमध्ये सहभाग तर नाही ना याची गुप्तपणे चाचपणी केली जाते. अशा तपासणीदरम्यान, एटीएसच्या पुणे युनिटला शहर परिसरात कोणतेही अधिकृत प्रवासी कागदपत्रे नसताना अनधिकृतरित्या काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असून हे तिघेही बांगलादेशात बंदी असलेल्या अनसरुल्लाह बांगला (एबीटी) या संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली होती. ही संघटना पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे मानले जाते.