ग्राहकांनी नेहमी जागरुक असणे गरजेचे- श्रीनिवास गलगली

0
16

गोंदिया,दि.१७ : ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाराची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरुक असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास गलगली यांनी केले.
१६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित दूरध्वनीधारक ग्राहक जागरुकता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ संशोधन अधिकारी के.मुरलीधर, वोडाफोन कंपनीचे व्यवस्थापक प्रशांत मुदलीयार, आयडीयाचे व्यवस्थापक श्री.भुपेशा, टाटा डोकोमोचे व्यवस्थापक इशांत कुरेकर, एअरटेलचे व्यवस्थापक प्रसाद हिरुळकर, बीएसएनएलचे व्यवस्थापक विलास बांते, जिओ कंपनीचे व्यवस्थापक मयंक श्रीवास्तव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दूरध्वनी ग्राहक संरक्षणासंबंधी श्री.गलगली यावेळी म्हणाले, मोबाईल नंबर पोर्टबिलीटी, अनसॉलिसिटेड कमर्शियल कम्युनिकेशन, मूल्याधारीत सेवा, तक्रार नोंद कार्यपध्दती व टेरिफ आदींबाबत ग्राहकांनी नेहमी दक्ष राहावे.
कोणत्याही तक्रारी अथवा सेवा, विनंती संदर्भात सेवा घेणाऱ्या व्यक्तीला ग्राहक दक्षता केंद्राशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर तक्रार नोंदवली जावून त्या तक्रारीची विस्तारीत माहिती जसे- तक्रार क्रमांक, दिनांक, वेळ, तक्रार निवारणासाठी लागणारा वेळ ही माहिती एसएमएसद्वारे ग्राहकाला दिली जाते. जर ग्राहक तक्रार निवारणाबाबत समाधानी नसेल तर तो उच्च अधिकाऱ्यांकडे जावू शाकतो. यासाठी ग्राहक ुुु.ींललाी.र्सेीं.ळप या संकेतस्थळाचा वापर करु शकतात. या संकेतस्थळावर ग्राहक दक्षता केंद्र, सर्वसाधारण माहिती, तक्रार केंद्र, उच्च अधिकारी यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहेत.
ग्राहकाला त्याच दूरध्वनी क्रमांकावर सेवा पुरविणारी कंपनी बदलायची झाल्यास ग्राहक झजठढ(१० आकडी मोबाईल क्रमांक) हा डचड १९०० या क्रमांकावर पाठवू शकतो. यासाठी णझउ कोडची मुदत ही १५ दिवसांसाठी राहील. मूल्यवर्धीत सेवा देताना सेवा पुरविणाऱ्या कंपनी ग्राहकांकडून दोनदा खात्री करुन घेतल्याशिवाय करु शकत नाहीत. शिवाय ग्राहकाला नको असलेली सेवा सुरु झाल्यास ती बंद करण्यासाठी मोफत क्रमांकाची सुविधा कंपनीने ठेवणे बंधनकारक आहे. ज्याचा शॉर्ट कोड १५५२२३ असा आहे, त्यावर ग्राहक डचड करु शकतात. अनावश्यक व नको असलेले व्यावसायीक जाहिरात संदेश बंद करण्यासाठी ग्राहक १९०९ या क्रमांकावर एसएमएस किंवा फोन करु शकतो. दूरध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपन्या दर सहा महिन्याला आपला टेरिफ प्लॅन दोन वर्तमानपत्रात छापून आणणे बंधनकारक आहे. यातील एक वर्तमानपत्र इंग्रजी भाषेतील व दुसरे क्षेत्रीय वर्तमानपत्रात प्रसिध्द करतील. एखादा नवीन टेरिफ प्लॅन कमीत कमी सहा महिने पुरविणे सुध्दा बंधनकारक आहे.
दूरध्वनी सेवेचा वापर न करणाऱ्या ग्राहकांची सेवा बंद करण्याबाबत पुढीलप्रमाणे नियम आहेत. प्रीपेड सेवेमध्ये ९० दिवसापेक्षा कमी दिवस सेवेचा वापर नसल्यास कंपनी सेवा बंद करु शकत नाही. ग्राहकाच्या दूरध्वनी खात्यात कमीत कमी २० रुपये किंवा त्याहून अधिक जमा असल्यास ही सेवा बंद करता येणार नाही. मोबाईल डिसकनेक्ट झाल्यावर पुन्हा सेवा सुरु करण्यासाठी १५ दिवसाचा अधिक कालावधी देण्यात यावा. दूरध्वनी सेवेप्रमाणेच केबल टीव्ही नेटवर्कच्या डिजिटायजेशन बाबतही यावेळी माहिती देण्यात आली. यामध्ये केबल ऑपरेटरकडेही यासंबंधी तक्रार निवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाला दूरध्वनी सेवा पुरविणारे अधिकारी, संस्थांचे कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील सदस्य, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, इंजिनियरींग कॉलेज टेलिकॉन कम्युनिकेशनचे विद्यार्थी-विद्यार्थीनी व दूरध्वनी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.