मुख्य बातम्या:

ओबीसी बहुजन चळवळीचे मार्गदर्शक इतिहासकार प्रा.कडू यांचे निधन

नागपूर,दि.17ः- ओबीसी बहुजन समाजाच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लढा देणारे तसेच मंडल चळवळीला विदर्भासह कानाकोपर्यात पोचविण्यासाठी काम करणारे ओबीसी बहुजन चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक,इतिहासकार सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक व पत्रकार म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. जेमिनी कडू (६८) यांचे शनिवारी दि. १७ मार्चला न्युरॉन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शैल जेमिनी, मुलगा संघर्ष आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.कडू यांचे गेल्या काही दिवसापुर्वी अपघात झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीतला एक मार्गदर्शक हिरावला गेल्याने धक्का बसला आहे.त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्यावतीने शोक व्यक्त करण्यात आले असून त्यांची पोकळी  भरुन निघणे कठीण असल्याचे म्हटले आहे.

Share