आम्ही आमचे पती,मुलबाळ कुरबान करू शकतो,परंतु शरीयतमध्ये हस्तक्षेप कदापी सहन करणार नाही -अनिसा फारुकी

0
9
नांदेड /बिलोली( सय्यद रियाज ),दि.18- केंद्र शासनाच्या प्रस्थापित असलेल्या तीन तलाक कायद्याच्या विरोधात शनिवारी बिलोलीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या आदेशांवर मुस्लिम मुत्तहीद महाजच्या वतिने मुस्लिम  महिलांचे तहसील कार्यालयासमोर झालेल्या धरणे आंदोलनात आम्ही आमचे पती मूळ बाळांना कुर्बान करू शकतो परंतु इस्लामी शरीयतमध्ये हस्तक्षेप कदापि सहन करणार नाही असे अनिसा फारुकी म्हणाल्या.
केंद्रातील मोदी सरकारने मुस्लिम महिलांच्या हिताच्या नावाखाली तीन तलाक विरोधात लोकसभेत विधेयक मंजूर केले असून ते राज्यसभेत प्रलंबित आहेत,हा कायदा शरीयतमध्ये हस्तक्षेप करणार असून महीलामध्ये या कायद्याबद्दल प्रचंड रोष असल्याचे शनिवारी धरणे आंदोलनास सहभागी हजारो यावरून स्पष्ट झाले आहे. बिलोली तहसीलसमोर व्यासपीठावर असलेल्या मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या महिला सदस्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचा कडाडून विरोध करून हल्लाबोल केला आहे.
देशात जवळपास २२ लाख महिला पुरुषापासून विभक्त राहतात यात मुस्लिम महिलांची संख्या केवळ दोन लाख असून यात केवळ ५४ हजार  तीन तलाखची प्रकरणे आहेत, सरकार त्या २० लाख महिलांच्या हिताची काळजी नसून केवळ मुस्लिम समाजाच्या शरियतमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा उपद्व्याप करू नये असे आव्हान उपस्थित मुस्लिम  महिलांनी दिले आहे.
शासनाला खरीच मुस्लिमांचा कळवळा असेल तर त्यांच्या शिक्षण,आरोग्य,बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढावा असे आव्हान बिलोली तालुक्यात उपस्थित मुस्लिम महिलांनी केले असून संबंधित केंद्र शासनाच्यावतीने मुस्लिम धर्माच्या शरीयत  कायद्यामध्ये तीन तलाखच्या विरोधात करण्यात आलेला कायदा रद्द करण्यात यावा यासंबंधीचे निवेदन उपजिल्हाधिकारी निवृती गायकवाड यांना देण्यात आले आहेत. सदरील निवेदनावर शेख फजलेजहाँ बेगम, अर्शिया नाज फारुखी ,नगरसेविका चाऊस मैमुना बेगम , शमा बेगम इनामदार,अंजुम सिध्दीकी,अनिसा फारुखी,सफिया बेगम,अंजुम  इनामदार यांच्यासह हजारो मुस्लीम महिलांच्या साक्ष-या आहेत.कार्यक्रमाची सुरुवात अक्सा बेगम यांनी नात,कुरान पठनने सुरुवात केली. सूत्रसंचालन अंजुम इनामदार तर आभार मौलाना मुबिन खान यांनी मानले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौलाना अहेमद बेग,आरीफ मोहम्मद,यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.मोर्चाच्यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.