हजारो शेतकर्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

0
10

गडचिरोली,दि.18ः-कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी १७ मार्च रोजी शिवसेनेच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.गेल्या सहा महिन्यांपूर्वी भाजपा सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची दखल घेत कर्जमाफ केले. परंतु प्रत्यक्षात अजूनही हजारो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. काही शेतकर्‍यांना कर्जमाफीचे पत्र मिळाले. परंतु, प्रत्यक्षात यादीत नावेच नाहीत. हे शासनाने शेतकर्‍यांची केलेली थट्टा आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची यादी त्वरित प्रकाशित करण्यासाठी हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आज संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, अहेरी विभाग जिल्हा प्रमुख विजय श्रृंगारपवार, महिला जिल्हा प्रमुख छायाताई कुंभारे, उपजिल्हा प्रमुख अरविंद कातट्रवार यांच्या नेतृत्वात हजारो शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यावर धडक दिली.
मोर्चामध्ये उपजिल्हा प्रमुख राजू कावळे, नंदू कुमरे, शहरप्रमुख रामकिरीत यादव, सुनंदा आतला, अमित यासलवार, हननसिंग चावला, नुतन कुंभारे, यादव, लोहकरे, राहूल सोरते, सुशिला जयसिंगपुरे, छाया भोयर, संजय आकरे, ज्ञानेश्‍वर बगमारे, गजानन नैताम, संदीप दुधबळे, नवनाथ लोहंबरे, वामन लोहंबरे, संदिप भुरसे, हिराजी होळी, योगाजी होळी, मोहन कुकुडकर, दिवाकर करकाडे, योगेश कुळवे, दादाजी बावणे, अविनाश सोडे, राजू भांडेकर, महेश भोयर, नामदेव कुमरे, योगेश लेनगुरे, जगदिश मेर्शाम, विजय गेडाम व शेकडोच्या संख्येत शेतकरी सहभागी झाले होते.