दतोरा,कटंगी,सरकारटोला शाळेत गुढी पाडवा-प्रवेश वाढवा उपक्रम

0
25

गोंदिया,दि.17ः- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या गुढी पाडवा-प्रवेश वाढवा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळामध्ये आज मुलांच्या स्वागताचा कार्यक्रम घेण्यात आला.गोरेगाव तालुक्यातील कटंगी(बु.)शाळेत सरपंच तेजेंद्र हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवप्रवेशीत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यासपक व सर्व शिक्षक,शिक्षिका यांच्यासह गावकरी उपस्थीत होते.

गोंदिया पंचायत समितीतंर्गत येत असलेली पूर्व मा. डिजीटल, सेमी इंग्रजी शाळा दतोरा शाळेत नवागत प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात शाळेला तोरणमाळा, पताका, फूगे व प्रवेश द्वाराला केळीच्या पानांनी हिरवेगर्द करून सूशोभीत करून गूढीपाडवा -प्रवेश वाढवा कार्यक्रम साजरा करण्यात आला.प्रवेश दिंडी लेझीमच्या व वाद्याच्या तालात गावात मिरवणूक काढून प्रवेश पात्र विद्यार्थींयांना समाविष्ट केले. नवागतांचे प्रवेश द्वारावर पूष्पगूच्छ देवून तसेच पूष्पवर्षाव करून टाळ्यांचा द्वारे स्वागत करून बिस्किट,चॉकलेट देवून नवागतांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व गावकरी तसेच पालक शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.

जि.प.पूर्व.माध्य.Digital कन्या शाळा,सरकारटोला येथे आज दि.18 ला गुढी पाडवा प्रवेश वाढवा या जि.प.गोंदियाच्या अभिनव उपक्रमातंर्गत गावातील भजनमंडळीची साथ घेऊन सजविलेल्या बैलगाडीत अभंग व किर्तनाच्या गजरात प्रवेशपात्र  मुलींना *बैलगाडीत बसवून आणण्यात आले.पालकांना जि.प.शाळेचे महत्व समजावून सांगितले गेले, ईंग्रजी शाळेच्या भुरळात न पडता आपल्या पाल्यांना जि.प.शाळेतच टाका सांगत प्रवेश प्रक्रिया पुर्ण करण्या आली.विद्यार्थ्यांचे पुष्पगुछ,चाँकलेट,बिस्कीट देऊन नवागतांचे स्वागत करन्यात आले, संपूर्ण कार्यक्रमाची धुरा वर्ग 7 वी च्या विद्यार्थीनींनी सांभाळले.

जि.प.प्रा.शा.कटंगीटोला येथे गुढी पाडवा प्रवेश वाढवा उपक्रमांतर्गत घरी जाऊन प्रवेश पात्र विद्यार्थयांना शाळेत आणण्यात आले.त्यांना फुगे व पालकांना फुले देऊन सन्मानीत करण्यात आले.यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.भरतीस पात्र 3 पैकी 1 कटंगीटोला ,1 वि.25%मध्ये चंचलबेन ला आणि 1 वि.25% मध्ये प्रकाशित होणार्या यादी च्या प्रतिक्षेत असून तिथे न झाल्यास शाळेत प्रवेश केला जाणार आहे.या शाळेत आज भरती पात्र मधील 1 आणि ऐच्छिक गटातील 10 असे 11 विद्यार्थ्यांची भरती करण्यात आली.