“गुढीपाडवा प्रवेश वाढवा” अभिनव उपक्रमाला मुख्याध्यापक व शिक्षकांचा डच्चू

0
13

*देवरी तालुक्यातील आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथील घटना*

देवरी/लोहारा: 18 मार्च

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या करिता गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सदर उपक्रम 2 वर्षांपासून राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी 10हजार विध्यार्थ्यांनी एकाच वेळेस गुढीपाडवा च्या पावन पर्वावर जिप शाळेत प्रवेश घेतला असे शिक्षणाधिकारी निरनिराळ्या शालेय व्हाट्स अप ग्रुप च्या माध्यमातून सांगितले. वेळोवेळी सर्वांना माहिती देऊन सुद्धा या अभिनव उपक्रमाला देवरी तालुक्यातील आदर्श केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा लोहारा येथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी डच्चू मारल्याने खळबळ उडाली आहे.
सदर शाळेचे मुख्याध्यापक पी.सी. ठाकरे यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सदर उपक्रम 17 मार्च ला राबविला, असे उत्तर दिले. याची शहानिशा करण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश राऊत यांना विचारले असता त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगितले. परिसरातील इतर शाळेमध्ये सदर उपक्रम प्रभात फेरी, नवोदितांचे स्वागत आणि गुढीपाडवा थाटात राबविला गेला. परंतु, आदर्श केंद्रीय शाळा असून देखील या शाळेला गुढीपाडवा च्या दिवशी कुलूप लावलेले होते. सदर शाळा फक्त प्रशिक्षण घेण्या करताच आहे का? असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
या प्रकारामुळे गावकऱ्यांनी सदर मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील आळशी अधिकारी आणि संबंधित शिक्षकावर कारवाई करण्यासाठी संबंधित क्षेत्राच्या आमदार यांच्याशी भेट घेण्याचे ठरविले आहे. यावेळी देवरीचे पंस गटशिक्षणाधिकारी साकुरे यांच्याशी दूरध्वनी वर संपर्क केला असता त्यांनी सदर केंद्रप्रमुख टेंभरे आणि मुख्याध्यापक ठाकरे यांना वेळोवेळी सूचना दिल्याचे सांगितले आणि पत्र देऊन केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक आणि शिक्षकावर कारवाई करण्याचे सांगितले.
“जिप शाळेची पटसंख्या वाढविण्याचे नवीन विक्रम करूयात इंग्रजी शाळांना धडकी भरवूयात” असे शिक्षणाधिकारी वेळोवेळी बोलायचे. परंतु, बेजबाबदार मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सदर उपक्रमाला डच्चू देत शिक्षणाधिकाऱ्यांच्या घोषणेला हरताळ फासल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर खरंच कारवाई होणार का? जिप शाळाचा दर्जा आणि पटसंख्या वाढेल का? या कडे गावकऱ्यांचे लक्ष आहे.