प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन खा.नेतेंच्या पुढाकाराने मागे

0
13

गडचिरोली,दि. १९ : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी १५ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषण मंडपाला अनेक नेत्यांनी भेट देऊन निवेदनातील मागण्या समजून घेतल्या. मात्र ठोस आश्वासन अथवा मागण्या निकाली निघाल्याशिवाय आपण उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार धनपाल मिसार यांनी केला होता. दरम्यान १९ मार्च रोजी सोमवारला खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर व उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सकारात्मक चर्चा केली. शिक्षकांच्या मागण्या लवकर निकाली काढणार, असे आश्वास खा. अशोक नेते यांनी दिल्यानंतर अखेर पाचव्या दिवशी सोमवारला मिसार यांनी उपोषण सोडले.
खा. नेते यांनी मिसार यांना लिंबू सरबत पाजून उपोषणाची सांगता केली. याप्रसंगी जि.प. सदस्य रमाकांत ठेंगरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुत्तीरकर, मुख्य लेखाधिकारी दीपक सावंत, शिक्षणाधिकारी (प्राथ.) ओमप्रकाश गुढे, शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम, पं.स. सदस्य विवेक खेवले, देसाईगंजचे पं.स. उपसभापती गोपाल उईके, भाजपचे पदाधिकारी स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित नेत्यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार व इतर पदाधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या विविध मागण्यासंदर्भात सांगोपांग चर्चा केली.
यावेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी रमेश रामटेके, नरेंद्र कोत्तावार, योगेश ढोरे, माया दिवटे, अरूण पुण्यप्रेड्डीवार, अशोक दहागावकर, गणेश काटेंगे, हेमंत मेश्राम, सुरेश नाईक, खिरेंद्र बांबोळे, राजेश बाळराजे, जयंत राऊत, रवींद्र मुलकलवार, डंबेश पेंदाम, मनोज रोकडे, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, संजय लोणारे, प्रेमचंद मेश्राम, संगीता लाकडे, राकेश सोनटक्के, रोशनी राकडे, प्रभाकर गडपायले, जीवन शिवणकर, गुणवंत हेडाऊ, गुलाब मने, केशव पर्वते, रामदास मसराम, दिलीप नाकाडे, रवींद्र सोमनकर, इर्शाद शेख, अविनाश पत्तीवार, प्रशांत काळे, रवींद्र धोंगडे आदींसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. यावेळी जयंत राऊत व प्रेमचंद मेश्राम यांनी आभार मानले.