आर्वी पंचायत समितीच्या छतावर चढून प्रहार सोशल फोरमचे आंदोलन

0
7

वर्धा,दि.20 – आर्वी तालुक्याच्या दहेगाव (गोंडी) येथील लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत सन २०१४ – १५ मध्ये घरकुल मंजूर करण्यात आले होते. मात्र अजूनपर्यंत त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नव्हती. त्यामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यानी आज प्रहार सोशल फोरमच्या बाळा जगताप यांच्या नेतृत्वात पंचायत समितीच्या छतावर चढून आंदोलन केले. अचानक प्रहार स्टाईलने झालेल्या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. अखेर प्रशासकीय अधिकाऱ्यानी मध्यस्थी करीत सहा लाभार्थ्याचे त्वरित अनुदान दिले. तर उर्वरित लाभार्थ्याचे नंतर देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.