अंगणवाडीसेविका धडकल्या जिल्हा परिषदेवर

0
7
गोंदिया,दि.२१ः- महाराष्ट्रातील असंघटीत क्षेत्रातील २ लाख अंगणवाडीसेविका मदतनिसाना ऐस्माअंतर्गत १५ मार्चला महिला व बालविकास विभागाने आदेश काढून अत्यावश्यक सेवामध्ये संप करण्याचा अधिकार हिरावून घेतला.त्या आदेशाच्या विरोधात 20 मार्चला गोंदिया जिल्हा परिषदेवर हिंदू मजूर सभा, आयटक अंतर्गत येणाèया अंगणवाडीसेविका मदतनिस संघटनेच्यावतीने मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. या मोच्र्योचे नेतृत्व दिलीप उटाने,हौसलाल रहांगडाले,शकुंतला फटींग,आम्रकला डोंगरे,विठा पवार,रामचंद्र पाटील यांनी केले.
शासनाने जो १५ मार्चला संपावर बंदीचा आदेश काढला तो रद्द करण्यात यावा व कर्मचाèयांवर दमन करणे बंद करावे,सेविका मदतनिस यांची सेवानिवृत्ती लाभ अजूनपर्यंत गोंदिया जिल्हा परिषदेतंर्गत अंगणवाडीसेविका व मदतनिसांना देण्यात आली नाही.त्यामुळे जवळपास ९८ कर्मचारी वंचित आहेत. याचा पाठपुरावा करून एकमुस्त रक्कम देण्यात यावी,जून २०१७ पासून मानधनात वाढ झाली आहे,ते लागू करावे व ऐरियस काढण्यात यावे, मानधन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला काढण्यात यावे व १ एप्रिल २०१८ पासून ५ टक्के मानधनात वाढ करण्यात यावी, सेविका मदतनिस यांची सेवा वय ६५ वरून ६० वर्षे करण्याचा जी.आर. रद्द करण्यात यावा, जिल्हा तक्रार निवारण समितीच्या बैठका नियमित घेण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. मोच्र्यात विना गौतम, सरीता मडवकर,जिवनलाल वैद्य,दुर्गा संतापे,ब्रिजुला तिडके,वंदना पटले, अंजना ठाकरे, पौर्णिमा चुटे, विनीता शहारे, वच्छला भोंगाडे,ललेश्वरी शरणागत,अर्चना मेश्राम, सुनिता मलगाम, लता बरेकर,ज्योती लिल्हारे,जयकुवर मच्छिरके, प्रतिमा रंगारी,प्रतिभा दहीकर, परेश दुर्गवार,चरणदास भावे, शोभा लेपसे, कांचना शहारे,विजय डोंगरे,पुष्पा ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या.