नांदेडच्या शीतल चव्हाणचे’बबन’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेश्रृष्टीत पदार्पण

0
51
नांदेड,दि.21 -नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील गोरलेगाव शेतकरी कुंटुबांतील मुलगी शीतल चव्हान हिने उद्या दि. 23 मार्च रोजी प्रदर्शीत होणाऱ्या ‘बबन’ ह्या मराठी चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पर्दापण केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. अशाच एका शेतकरी कुंटुबातली असलेली, मागील अनेक काळापासून छोट्या पडद्यावर मराठी मालिकांमधून, जाहिरातींमधून, मॉडेलिंग क्षेत्रात काम करणारी नवोदित सिनेअभिनेत्री शीतल चव्हाण हिने ‘बबन’ चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटश्रृष्टीत पदार्पण केले आहे.
‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे  ‘बबन’ चित्रपटाचे दिग्दर्शक असून, शीतल चव्हाण ‘बबन’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ग्रामीण भागातून येऊन पहिलाच मराठी चित्रपट राष्ट्रीय पारितोषक विजेत्या दिग्दर्शकासोबत करायला मिळाल्याने शीतल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कलेचा कुठलाही वारसा नसलेल्या शीतलने ग्रामीण भागातून येऊन थेट ‘बबन’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. पहिल्यांदाच चित्रपटात भूमिका करत असूनही तिने नवखेपणाचा लवलेशही दाखवला नाही. खरोखरच शीतल चव्हाण ही ब्युटी विथ ब्रेन्स आहे. तिचा अभिनय बघून ती लवकरच आघाडीची अभिनेत्री होणार, यात शंकाच नाही, असं मत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केलं.