वाहनाच्या धडकेत चंद्रपूर जिल्ह्यात चार रानटी डुक्कर ठार

0
87

चंद्रपूर,दि.21: जिल्ह्यातील तोहोगाव-कोठारी या मार्गावर आज बुधवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार रानटी डुक्कर जागीच झाल्याची घटना येथे घडली.
हा जिल्हा मार्ग एका बाजूने जंगलाने वेढलेला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच जंगली श्वापदांचा वावर असतो. ही जंगली श्वापदे रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी वा शिकारीसाठी बाहेर पडतात तेव्हा ती रस्त्यावर येतात. अचानक समोर आलेले श्वापद पाहून वाहनचालक गांगरून जातो आणि तो अधिक जोरात वाहन पुढे नेतो. अशाच या मुक्या जनावरांचा मात्र बळी जातो.