शशीकरण पहाडीपरिसरातील जंगलात आग

0
5

सडक अर्जुनी,दि.21 : नवेगावबांध-नागझिरा वन्य प्राण्यांसाठी बफर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र क्रमांक ५१२, ५१३, ५३२, ५३३, ५३५ च्या काही भागात सोमवारच्या रात्रीला आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे.ही आग तेंदूपत्ता कंत्राटदारांनी लावल्याची शंका वन्यजीव विभागाचे अधिकारी वर्तवू लागले आहेत.
तेंदूपत्ता तोडणी हंगामापूर्वी कंत्राटदार तेंदू मोठ्या प्रमाणात यावा, यासाठी जंगलात आग लावतात. यामुळे बरेचदा वनसंपत्तीचे नुकसान होते. वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रात येणाºया मुरदोली, दोडके, पुतळी, डुग्गीपार शशीकरण पहाडी, शेंडा कोयलारी, आलेबेदर या परिसरातील जंगलात ही आग लागली. यातील काही भाग वनविकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात येत आहे.गेल्यावर्षी सुध्दा याच भागात मोठ्याप्रमाणात जंगलात आग लागली होती.सोमवारला शशीकरण पहाडी परिसरातील क्षेत्रात काही मोहफुल तोडणार्या व्यक्तींनी आग लावली होती. यामुळे ६ हेक्टरमधील वनसंपदेची हानी झाली असली आग वेळीच आटोक्यात आणण्यात आल्याचे वनपरिक्षेत्रधिकारी गोवर्धन राठोड यांचे म्हणने आहे.