मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्यांना वनविभागाची कोठडी

वाशिम,दि.22 – दुतोंड्या (मांडूळ) जातीच्या सापांना पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यां दोघांना २१ मार्च रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास  कारंजा ते दारव्हा मार्गावरील १३२ केव्ही वीज केंद्राजवळ कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत वनविभाच्या हवाली केले. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कारंजा शहर पोलीस शहरात २१ मार्च रोजी रात्री दरम्यान गस्त सुरू असताना वीज केंद्राजवळ एक संशयीत सकाळी ३.३० वाजताच्या दरम्यान कारंजा शहर पोलिसांना आढळून आला. अधिक चौकशी केली असता, त्याचेकडे एक मांडूळ जातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवून चैकशी केली असता, तपासात आणखी दुसºया व्यक्तीकडेही एक साप असल्याचे निष्पण्ण झाले. त्या दोघांनाही कारंजा शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. दरम्यान, शेख अहेमद अब्दुल जब्बार (३५) रा. दाईपूरा कारंजा व शेख जावेद शेख अहमद (३५)  रा. मंगळवारा कारंजा अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर वन्य जीव अधीनियम १९७२ नुसार कारवाई करण्यात आली. यावेळी अडीच किलो वजनाचा एक व एक किलो ७००  ग्रॅम वजनाचा ४२ इंच लांब व साडेपाच इंच जाड असे दोन साप पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर साप लाडखेड जि. यवतमाळ येथून आणल्याचे आरोपींनी सांगितले. यानंतर पोलिसांनी या दोघांनाही कारंजा वनविभागाच्या हवाली केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाºयांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता. त्या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी शनिवारपर्यंत वनविभागाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Share