मुख्य बातम्या:

बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी शेळके यांना सव्वालाखाची लाच घेताना पकडले

बीड,दि.22 – येथील जिल्हा पुरवठा अधिकारी नरहरी शेळके यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून एक लाख 15 हजार रुपयांची लाच घेताना आज दुपारी 12 वाजता एसीबीच्या पोलिसांनी रंगेहात पकडले. शेळके यांच्याबरोबर असणारे कारकून फड यांनाही पकडण्यात आले आहे. शेळके यांना एसीबी ऑफिसला नेण्यात आले असून तिथे त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Share