मुख्य बातम्या:

बिलोलीत शॉर्ट सर्किटमुळे सात दुकानांना भीषण आग

बिलोली (नांदेड ),दि.22 : पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यात चार दुकाने पूर्णतः जळाली आहेत तर तीन दुकानांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि, आज पहाटे ४ वाजेच्या दरम्यान पंचायत समिती कार्यालयाच्या शेजारील सात दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच देगलूर येथील अग्निशामक दलाची गाडी ६ वाजता आली. मात्र तोपर्यंत आगीत चार दुकाने पूर्णतः जळुन खाक झाली होती. तर अन्य ३ दुकानाचे मोठ्याप्रमाणावर नूकसान झाले. यात दुकानातील ५  झेराँक्स मशीन, ३ संगणक, १ लाखाचे साहित्य, जनरेटर, लँमीनेशन मशिन, कँमेरा, लँपटाँप, आदी जळून २० लाखांचे नुकसान झाले. तसेच आग विझवताना एक पोलिस कर्मचारी जखमी झाले. सर्वच दुकाने सुशिक्षित बेरोजगार युवकांची होती. यामुळे त्यांना आगीचा मोठा फटका बसला आहे.

Share