मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रमास मनाई

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश

नागपूर,दि.22 : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत.गेल्या 7 डिसेंबरला भाजपचे नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला केवळ एक वर्ष शिल्लक राहिलेले असताना, या पोटनिवडणुकीवर विनाकारण खर्च करू नये. तसेच जनतेच्या पैशाचा अपव्यय टाळावा. या निवडणुकीवर आणखी 6 ते 8 कोटी रुपये खर्च होणार आहेत. सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी असल्याने हा खर्च करू नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली गेली होती.या याचिकेवर उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एक आठवड्याची मुदत दिली आहे.

उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय लागेपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत भंडारा-गोंदियाची पोटनिवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी भंडरा-गोंदियाची पोटनिवडणूक का घेतली जात नाही, अशी विचारणा केली होती. तसेच पटोले यांनी निवडणूक आयोगाला त्वरित निवडणूक घेण्यासाठी निवेदनही दिले आहे.

Share