मुख्य बातम्या:

कोसरे कलार समाज सघंटनेचे मुख्यमंत्र्याचे नावे गोंदिया एसडीओंना निवेदन

घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा देत देशमुख कुुटुबियांना न्याय देण्यात यावे
गोंदिया,दि.२२ः- देवरी तालुक्यातील फुटाणा येथील प्रतिष्ठित देशमुख कुटुंबातील २० वर्षीय युवतीवर अमानुषपणे अत्याचार करुन हत्या करण्यात आलेल्या घटनेचा कोसरे कलार समाज संघटनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.तसेच या घटनेतील आरोपीला व सहभागी व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा देऊन देशमुख कुटुबिंयाना न्याय देण्यासंबधीचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नावे गोंदिया उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.निवेदनात भंडारा जिल्ह्यातील लाखादूंर तालुक्यातील किन्ही- बारव्हा येथील रहिवासी असेलल्या मयंक(गोलू)देशमुख या युवकांने २० वर्षीय युवतीवर मध्यरात्रीच्या सुमारास अमानुषपणे बळजबरी करुन निर्दयीपणे हत्या केल्याची घटना लाखनी येथील राध्येशाम क्षिरसागर यांच्या घरी उघडकीस आली.सदर नराधम युवक हा साकोली येथील एका ट्रक्टर कंपनीत कामावर होता.या युवकाने खोटी माहिती देत कोसरे कलार समाजातील युवतीची फसवणूक करुन हत्या केल्याने आरोपीचा शोध घेत मदत करणाèयानाही अटक करण्याची मागणी निवेदनात केली आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके,सहसचिव उमेश सहारे,दिनेश फरकुंडे,रमन उके,नरबद मेश्राम,दुर्गाबाई तिराले,उमेश कावडे,डी.एस.दखने,अविनाश मेश्राम,कुणाल चौरागडे,पुरणचंद मेश्राम,भुवनलाल देशमुख,सतीश दखणे,किरणकुमार कावळे,राजेंद्र कावळे,संजय शेंडे,संतोष मेश्राम,महेश मेश्राम आदी उपस्थित होते.

Share