चिटुर गावाला दुसर्या क्रमांकाचा राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम पुरस्कार

0
8

गडचिरोली,दि.23(अशोक दुर्गम): गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण विभागाच्या सिरोंचा वनविभाग सिरोंचा अंर्तगत येणार्या चिटुर वनव्यस्थापन समितीला राज्यस्तरीय संत तुकाराम वनग्राम उत्कृष्ट संयुक्त वनव्यस्थापन समिती द्वितीय पुरस्कार 2016-17 मिळाला आहे.हा पुरस्कार 21 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय वनदिनानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडनविस,राज्याचे वनमंत्री सुधीरऊ मुनगंटीवार,पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.हा पुरस्कार चिटुर येथील संयुक्तवनव्यस्थापन समितीचे अध्यक्ष  समय्या येल्लाबोईना, सचिव तथा क्षेत्रसहाय्यक संजोग खरतड, वनरक्षक आर.एल.बानोत,सदस्य राजन्ना अल्लम  यांनी स्विकारला.प्रशस्तीपत्र आणि 1 लाख 66 हजार 600 रुपयाचा धनादेश वनसमितीला उत्कृष्ठ कार्यासाठी देण्यात आलेला असून हा निधी वनसमितीला आपल्या गावाच्या विकासासह वनव्यवस्थापनावर खर्च करावयाचा आहे.चिटूरला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री  राजे अंबरिश आत्राम यांच्यासह जिल्हाप्रशासन व वनविभागाच्या वरिष्ठांनी वनसमितीचे अभिनंदन केले आहे.