आगीमुळे नवेगावबांध-नागझिरा बफर झोन क्षेत्रातील वन्यजीव संकटात

0
9

गोंदिया,दि.23ः-नवेगावबांध-नागझिरा वन्य प्राण्यांसाठी बफर झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्र क्रमांक ५१२, ५१३, ५३२, ५३३, ५३५ मध्ये सोमवारला लागलेली आग बुधवारच्या रात्रीपर्यंत कायम होती.त्यातच कंपार्टमेंट क्रमांक  498 ,499,511, 531,534,536 हा भाग याभागातही आग लागल्याने हा संपुर्ण परिसरच आगीच्या विळख्यात गेला आहे.तरीही वन्यजीव विभाग व वनविभाग मात्र आगीवर नियंत्रण असल्याचे सांगत आहे. गुरुवारला मुरदोली,दोडके,जांभळी,पुतळी,डुग्गीपार,शशीकरण पहाडी,शेंडा,कोयलारी,कोहळीपार,जांभली यासह  गंगाझरी वनपरिक्षेत्रालगतच्या नागझिरा व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरातील हरितलाव,केरझरा,खरोबा पहाडी,पागंडी,जुनेवानी भागातही ही आग पसरली आहे.

आगीमुळे जे नुकसान होते,ते तेंदुपत्ता गोळा करण्याची वेळी होत असते.या आगीमुळे तेंदुंपानापासून मिळणारे उत्पादन मात्र अधिक मिळत असले तरी अभ्यासाअंती १० हजार रुपये प्रती हेक्टर हे आगीमुळे नुकसानही होत आहे.जेव्हा पर्यंत तेंदुपत्ता गोळा करण्याच्या प्रखियेला बंद करण्यात येत नाही,तोपर्यंत हे होऊ शकत नाही.सरकार जर एकीकडे प्लास्टिक बंदीचा निर्णय पर्यावरणासाठी घेत असेल तर तेंदुपत्ता गोळा करण्याच्या प्रकियेवरही बंदी आणली तर पर्यावरणाला अधिक चांगले होईल.फक्त ५ ते १० टक्के ज्या आगीच्या घटना घडल्या त्याच वृत्तपत्रात आल्या असून संबधित विभाग आगीचे प्रमाण कमी दाखवत नुकसान कमी होत असल्याचे दाखविले जात असल्याचे मागील काही वर्षापासून दिसून येत असल्याचे माजी वनअधिकारी अशोक खुणे यांचे म्हणने आहे.
ही आग तेंदूपत्ता कंत्राटदारांनी लावल्याची विश्वसनीय माहिती असून तेंदूपत्ता तोडणी हंगामापूर्वी कंत्राटदार तेंदू मोठ्या प्रमाणात यावा, यासाठी जंगलात आग लावतात. यामुळे बरेचदा वनसंपत्तीचे नुकसान होते. वन्यप्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो.ही आग बफरझोन क्षेत्रात पसरली. वन्यजीव प्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार याच परिसरात वन्यजीवांचा सर्वाधिक वावर असतो. त्यामुळे या आगीची झळ वन्यप्राण्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.यातील काही भाग हा वनविकास महामंडळाच्या भागात येत असून त्या विभागाचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.माजी वनअधिकारी यांच्यामते तर या आगीचा फटका अंदाजे 4000 हेक्टर मधील जंगलाला बसला आहे.या परिसरातील वन, वन्यजीव, आणि वनविकास महामंडळाच्या अधिका-यांना तेंदुपत्त्याकरीता आग लावली जात असल्याची माहिती दिली गेल्यानंतरही दुर्लक्ष केल्याचे काही समाजसेवकांचे म्हणने आहे.
नवेगावबांध-नागझिरा या बफर झोन क्षेत्रात लागलेल्या आगीची माहिती वन्यजीव प्रेमी संस्थेच्या सदस्यांनी वन,वन्यजीव आणि वनविकास महामंडळाच्या अधिका-यांना दिली तसेच अद्यापही काही भागात आग कायम असल्याचे सांगितले.त्यावर या विभागाच्या अधिका-यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक साधन सामुग्रीचा अभाव असल्याचे सांगितले. मात्र या सर्व प्रकारामुळे कोटयावधी रूपयांच्या मौल्यवान वनस्पतीचे नुकसान झाले आहे.‘‘जंगलात कधीही आग लागत नाही. आणि जंगलाला आग लागायची कोणती कारणे ही नाही ही मानवनिर्मित लावण्यात आलेली आग आहे. याला मानवच जवाबदार असल्याचे नेहमी आढळून आले आहे.