नागरिकांनो, अज्ञानाकडून  विज्ञानाकडे  वाटचाल करा- मनोहर चंद्रिकापुरे

0
10
अर्जुनी मोरगाव,दि.२४ : – आजही एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या युगात मोठ्या प्रमाणात ग्रामिण भागात अंधश्रद्धा फोफावलेली आहे. एकविसाव्या शतकात वावरताना नागरिकांनी अज्ञानाकडून विज्ञानाकडे वाटचाल करण्याचे आवाहन राष्ट्वादी काँग्रेसचे नेते मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी केले. ते खैरी सुकळी येथे आयोजित परमात्मा एक सेवक संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
 यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  देवीदास टेकाम,सरपंच लालसींह चंदेल, सरपंच सत्यभामा बावने, दादाजी राउत , ज्ञानदेव प्रधान,.धम्मदिप मेश्राम,माजी सरपंच मेश्रामताई, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.पूढे बोलताना चंद्रिरकापूरे म्हणाले,समाजामध्ये अनेक रूढी-परंपरा आपण आपल्या परीने जपत असतो. माणसाने नेहमीच श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी. आपण ज्याच्याकडे खूप काही असते, त्यालाच द्यायला उत्सुक असतो. पण ज्याच्याकडे नाही त्याच्या विचारही डोक्यात घेत नाही. कामाला असणारी मावशीच काय पण आपल्या आसपास असे खूप जण असतात, ज्यांना आपल्या मदतीची खरंच गरज असते, पण होते मात्र उलटेच. आपण ज्या परंपरा जपतो त्यांचा योग्य उपयोग होतो का हेही पाहिलेच पाहिजे.आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण त्या परंपरांना व्यवस्थित जपतात. ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण त्यामुळे त्यांना स्वत:ला त्रास होत नाही ना याचीही त्यांनी स्वत:च काळजी घ्यायला हवी. असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे  संचालन खुशाल भोयर यांनी केले. तर आभार सुनील कावळे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सेवक व नागरिक उपस्थीत होते.