दुचाकीच्या अपघातात दोन ठार,दोन जखमी

0
20

नायगाव(नांदेड) दि.२४ : दोन दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन दोन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना नरसी लोहगाव रस्त्यावरील वळणावर शनिवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान घडली. सदर अपघातील एकाचे पंधरा दिवसापूर्वीच लग्न झाले होते .
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दुचाकी क्र.टी.एस.१६ . ई.जे . ३११५ सदर गाडी नरसी हुन बिलोली कडे जात होती .तर समोरून येणारी दुचाकी क्र. एम.एछ.२६ .बी.एफ.१२६० या दोन दुचाकीची नरसी लोहगाव दरम्यान असलेल्या वळणावर आमणे सामने जोरदार धडक होऊन या अपघातात धानोरा ता.नायगाव येथील रहिवासी असलेला चंद्रकांत हानंमत बोडके वय १९ वर्षे हा जागीच ठार झाला .तर दुसऱ्या दुचाकीवरील शेख जाकीर मेहबूबसाब वय २० रा.होटाळा ता.नायगाव ह.मु. सालुरा ता.बोधन यास घटनास्थळावरून नायगाव च्या रूग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला .तर शेख शकील शेख अहेमद रा .सालुरा ता .बोधन हा व अन्य एक असे दोन जण या अपघातात गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड च्या रूग्णालयात पाठविण्यात आले आहे .

धानोरा येथील मयत चंद्रकांत बोडकेचे गेल्या पंधरा दिवसापूर्वीच लग्न झाले होते त्या च्या या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे .एका जखमीचे नाव मात्र कळू शकले नाही .अपघाताची माहिती रामतिर्थ पोलिसांना मिळताच पोलीस जमदार वडजे व पठाण हे दोघे घटनास्थळी पोहचून मयत व जखमींना रूग्णालयात पाठविले पुढील तपास स.पो.नि.दिलीप गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत .