गोंदियात होणार महिलासांठी दर्जेदार प्रशिक्षण केंद्र-आ.अग्रवाल

0
8

गोंदिया,दि.२४- देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आजपर्यंत महिलांना समान न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले असून आपल्या समाजामध्ये महिलेला उच्चस्थान आहे.हजारोवर्षांचा इतिहास बघितल्यास आपणास आपल्या मातांनी उच्चस्थान प्राप्त केल्याचे बघावयास मिळते.या महिलांना चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी गोंदियात चांगेल व दर्जेदार प्रशिक्षण केंद्र होणार असल्याचे विचार आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपल्या उदघाटकीय भाषणात व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय भव्य महिला मेळाव्याचे आयोजन आज शनिवारला सकाळी ११ वाजता बालाघाट मार्गावरील जिनियस रिसोर्ट नागरा येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मेळाव्याचे उदघाटन आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी उपस्थित होत्या.अतिथी म्हणून महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे,गोंदिया प.स.सभापती माधुरी हरिणखेडे,उपसभापती चमनलाल बिसेन,नागरा सरपंच पुष्पाबाई अटराहे,उपसरंपच अमृतलाल पतेहे,मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी,माजी जिप अध्यक्ष उषा मेंढे,स्नेहा गौतम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की महिलांच्या उत्थानासाठी शासन कटिबध्द असून आमदार अग्रवाल यांच्या सातत्याने सुरु असलेल्या पाठपुराव्यामुळे चांगले काम होऊ घातले आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा मडावी म्हणाल्या की,महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून गोंदिया जिल्हयातील महिलांना सक्षम करण्याचे कार्य महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमामातून सातत्याने सुरु आहे.त्याचप्रमाणे महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे यांनीही आपला विभाग महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपुर्ण कार्य करीत असून शासनाच्या प्रत्येक योजना महिलांपर्यत पोचविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस अहोरात्र कार्य करीत असल्याचा उल्लेख केला.