मातोश्री योजने अंतर्गत खोपडा-इसापूर ग्रामपंचायत ईमारत बांधकामाचे भूमिपूजन

0
11

गोंदिया,दि.25 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील स्वतःच्या स्वंतत्र ईमारत नसणारे ग्रामपंचायतीला ९०% अनुदान व १०% ग्रामपंचायतचा स्वनिधीतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेंतर्गत ग्रामपंचायत भवन बांधकामाचा निर्णय घेण्यात आला.त्या निर्णयानुसार तिरोडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत खोपडा-इसापूर ग्रामपंचायतीने या योजनेंतर्गत ग्रामपंचायत भवन बांधकामाचे भूमिपूजन २३ मार्चला केले आहे.या योजनेंतर्गत भूमिपूजन करणारी खोपडा-इसापूर ही राज्यातील बहुदा पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून या ईमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
राज्यात २८००६ ग्रामपंचायत असून ४२५२ ग्रामपंचायतींना स्वतःच्या ईमारत नसल्याने कामकाज करण्यास अडचण निर्माण होत असल्याने ग्रामविकास विभागाने ज्या ग्रामपंचायतींना स्वताची ईमारत नाही.तसेच हजार पेक्षा कमी लोकसंख्या असल्यास १२ लाख रुपये तर त्यावर असलेल्या ग्रामपंचायतीला त्यापेक्षा अधिक निधी बांधकाम खर्चानुसार ९०% प्रशासन व १०% ग्रामपंचायतीचा निधीतून करावयाचे आहे.तिरोडा तालुक्याली खोपडा-इसापूर ग्रामपंचायतीला ९०% प्रशासन निधीतंर्गंत 16 लाख 20 हजार रुपये मिळणार आहेत.त्यामध्ये 10 लाख 20 हजार रुपयात ही ग्रामपंचायत ईमारत तयार होणार आहे.या ईमारतीचे भूमिपूजन पंचायत समिती तिरोडाचे उपसभापती मनोहर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी जावेद इनामदार, पंचायत समिती सदस्य जया धावडे,खोपड्याचे सरपंच संतोष बावनकर,पांजराचे सरपंच राजेंद्र चामट,सरांडीचे सरपंच माणिक वाणी,येडमाकोटचे उपसरपंच  कापसे, उपसरपंचा दुर्गा किरपानकर, पोलीस पाटील प्रशांत हिरकने, तंटामुक्त समिती अध्यक्ष किशोर बावनकर व गावकरी उपस्थित होते.