मुख्यमंत्र्याच्या हस्ते जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन

0
7

नागपूर,दि.25 : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदाताई जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल, मनपा नेते संदीप जोशी, मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.नागपूर महानगरपालिका व सोलर इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्यातून येथील जनतेला ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क येथे विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून जॉगींग, वॉकींग, सायकल ट्रॅक, वृक्षलागवड, हिरवळनिर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कस्तुरचंद पार्क येथे आज मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जनसुविधांच्या कामाचे कोनशिला अनावरणही करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदाताई जिचकार यांनी सोलर इंडिया लिमिटेड कंपनी यांनी करावयाच्या कामाचे संकल्पचित्र आणि चित्रफितीची पाहणी केली.यामध्ये अशोक स्तंभ व सेल्फी पॉईंट, विविध कंपन्यांकडून “आय लव्ह नागपूर”चा लोगो बनविण्यात येणार आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, मेट्रो स्टेशन वॉल आदि कामे याअंतर्गत होणार आहेत.