वसतीगृहाला गावकèयांचा विरोध,जि.प.सभापतीसह गावकèयांची पालकमंत्र्यांशी चर्चा

0
11
गोंदिया,दि.२६ : येथील नंगपूरा/मुर्री येथे समाजकल्याण विभागातर्फे बांधण्यात येणाèया वसतीगृहाला गावकèयांचा विरोध होता. सातत्याने वेळोवेळी २०१२ पासून ग्रामसभेच्या माध्यमातून या कामाचे विरोध दर्शवून संबंधित विभागाला ठराव पाठविण्यात आले आहे. तरी मागील काही दिवसांत बांधकाम सुरू करण्याच्या हालचालीला वेग आल्याचे पाहून गावकèयांनी गावकरी दक्ष समितीच्या वतीने ग्रा.पं. कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. गवकèयांच्या भावना जाणून जि.प.कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांनी पुढाकार घेऊन २५ मार्च रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या निवासस्थानी गावातील सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक पुढाèयांसह प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यावर पालकमंत्री बडोले यांनी गावकक्तयांचे विचारावर गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंत्याला भ्रमणध्वनीने संपर्क करून हे काम त्वरित थांबविण्याचे निर्देश दिले.त्यावर सभपती श्रीमती सोनवाने यांच्यासह उपस्थित गावकèयांनी बडोले यांचे आभार मानले. यावेळी प्रामुख्याने जि.प. सभापती शैलजा सोनवाने, सरपंच हेमंत येरणे, माजी तंमुस अध्यक्ष अशोककुमार हरिणखेडे, माजी पं.स. सभापती प्रकाश रहमतकर, तंमुस अध्यक्ष भूवन सोनवाने, तिर्थराज हरिणखेडे, नरेंद्र मेश्राम, महेश शहारे, कमलेश सोनवाने, उत्तमचंद शरणागत, राजकुमार टेकाम, तिर्थराज रहांगडाले, ओमप्रकाश रहांगडाले, राधेश्याम शरणागत, धन्नालाल सोनवाने, महेश मेश्राम आदी उपस्थित होते.