ओबीसी समाजाचा लढा मोठा होण्याची गरज-उमराव आठोडे यांचे प्रतिपादन

0
18
लाखनी येथे ओबीसी सेवा संघ कार्यालयाचे उद्घाटन
लाखनी,दि.२६ :देशात ओबीसी समाज बहुसंख्य आहे, मात्र तरीही आपन आपल्या संवैधानिक मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष भांडत आहोत. म्हणून ओबीसी समाजाचा लढा मोठा होण्याची गरज आहे. मी ओबीसी म्हणत सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येणे आवश्यक आहे.  असे प्रतिपादन माजी जि.प.सदस्य तथा कृउबास लाखनीचे संचालक उमराव आठोडे यांनी केले. ते ओबीसी सेवा संघ शाखा लाखनीच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य माधवराव भोयर तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प.सदस्य जयकृष्ण फेंडरकर, पत्रकार प्रमोद भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते. सन्माननीय अतिथिंच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने असूनही गेली अनेकवर्ष मागासला आहे त्यामुळे आपल्या मागन्यांसाठी एकत्र येऊन व्यवस्थेला आपलं वजन दाखवून देने आवश्यक आहे त्याशिवाय पर्याय नाही. आणि हे होण्यासाठी चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. त्यासाठी जे सुंदर कार्यालय बनवले आहे त्याचा  उपयोग करून घेतला पाहिजे असं मत मान्यवर मंडळीनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी सेवा संघ लाखनीचे अध्यक्ष प्रा. उमेश सिंगणजुडे यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत वाघाये यांनी केले. कार्यक्रमाला रामदास सार्वे, संजय वनवे, यादवराव गायकवाड, गोपाल नाकाडे, मंगलमूर्ती किरणापुरे, बालू फसाटे, नितेश टिचकुले, गंगाधर लुटे, सुधीर काळे, रवि भोयर, निखिल सिंगणजुडे, प्रभावती भोयर, आशा वनवे, स्मिता सिंगनजुडे मीनाक्षी सिंगणजुडे, सारिका रेहपाडे तसेच सर्व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.