मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

पुरुष व महिला मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु

गोंदिया,दि.२६ : जिल्ह्यातील पुरुष मानसेवी होमगार्ड सदस्यांची नोंदणी २ एप्रिल रोजी व महिला मानसेवी होमगार्ड सदस्यांची नोंदणी ३ एप्रिल रोजी पोलीस मुख्यालय कारंजा येथे सकाळी ६ वाजतापासून होणार आहे. सकाळी ५ ते दुपारी १२ या वेळेत हजर राहणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांना मैदानावर प्रवेश दिला जाईल.
पुरुष व महिला होमगार्ड नोंदणी पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहे. शिक्षण कमीत कमी १० वी उत्तीर्ण असावा. त्याचे वय २० ते ५० दरम्यान असावे. पुरुषाकरीता उंची १६२ सें.मी. व महिलाकरीता उंची १५० सें.मी. असावी. पुरुषाची छाती ७६ सें.मी. व फुगवून ८१ सें.मी. असावी. उमेदवारास विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक, शारिरीक चाचणी दयाची लागेल. निवड होवून पात्र ठरलेले उमेदवार हे वेतनी सेवेत असतील तर त्यांना वेतनी सेवेत असल्याचे कार्यालयाचे अथवा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक व इतर अन्य तपशिलासह सर्व संबंधित प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. उमेदवारास नोंदणीच्यावेळी त्यांना स्वखर्चाने यावे लागेल. तसेच नोंदणीच्यावेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवाराची निवड ही पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल.
नोंदणीकरीता येतांना उमेदवाराने २ पासपोर्ट साईज फोटो, मुळ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, १० वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्राच्या मुळ प्रत व साक्षांकीत प्रत सोबत आणावे. याशिवाय आयटीआय प्रमाणपत्र असल्यास जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतला असल्यास जड वाहन चालक परवानाधारक उमेदवार असल्यास, नागरी संरक्षण सेवेत असलेले परंतू स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास, माजी सैनिक, एनसीसी-बी व सी प्रमाणपत्रधारक, ओळखपत्र, आधारकार्ड किंवा पॅनकार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
तालुकानिहाय पुरुष व महिला उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका- पुरुष-निरंक, महिला- १०. आमगाव तालुका- पुरुष-निरंक, महिला-५, तिरोडा तालुका- पुरुष १५, महिला-५, अर्जुनी/मोरगाव तालुका- पुरुष-२५, महिला-१०, सालेकसा तालुका- पुरुष-१०, महिला-४, गोरेगाव तालुका- पुरुष-निरंक, महिला-५, देवरी तालुका पुरुष-१५, महिला-निरंक. असे एकूण ६५ पुरुष होमगार्ड आणि ३९ महिला होमगार्ड पदासाठी ही भरती करण्यात येणार आहे. होमगार्ड ही मानसेवी संघटना आहे. या संघटनेत नोंदणीपात्र ठरलेल्या उमेदवारांना भविष्य काळात वेतनी कर्मचाऱ्यांप्रमाणे फायदे अनुज्ञेय असणार नाहीत. तसेच त्यांना या संघटनेत कायमस्वरुपी सामावून घेतले जाणार नाही. असे जिल्हा समादेशक होमगार्ड गोंदिया यांनी कळविले आहे.

Share