जितेंद्र राऊत नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण

0
12

गडचिरोली,दि.२७: येथील कॅम्प एरियातील रहिवासी जितेंद्र हरिश्चंद्र राऊत यांनी वाणिज्य विषयात नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.जितेंद्र राऊत यांनी एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण स्थानिक शिवाजी महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ‘कंपनी सेक्रेटरी’ची पदवीही प्राप्त केली. सध्या ते नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये एम.फील करीत असून, डॉ.पराग जोशी यांच्या मार्गदर्शनात ‘अ स्टडी ऑन फायनान्शिअल डेरिवेटीव्ह’ या विषयावरील प्रबंधही रातुम नागपूर विद्यापीठाकडे सादर केला आहे. अलिकडेच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत घेण्यात येणारी नेट व पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे घेतली जाणारी सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई रेखा राऊत, बहीण रिचा राऊत, मामा प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व नातेवाईकांना दिले आहे. या यशाबद्दल जितेंद्र राऊत यांचे चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.