2 एप्रिलपासून डॉक्टर जाणार देशव्यापी संपावर

0
7

नवी दिल्ली,दि.27(वृत्तसंस्था)- प्रलंबित मागण्यांसाठी डॉक्टर मोदी सरकारविरोधात देशव्यापी संप पुकारणार आहेत. या आर या पारच्या लढाईसाठी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 25 मार्च रोजी दिल्लीत नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात डॉक्टरांनी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत संप पुकारण्यासंदर्भात सर्व डॉक्टरांचं एकमत झालं आहे.
या महापंचायतीला देशभरातील 25 हजार डॉक्टर, जुनिअर डॉक्टर्स, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही उपस्थित होते. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक गरिबांच्या विरोधात आहे. या विधेयकातील काही मुद्द्यांमुळे वैद्यकीय व्यवसायात भ्रष्टाचार वाढेल, असंही  डॉ. वानखेडकर म्हणाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील वैद्यकीय व्यवसायाचं नुकसान झालंय. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकातील काही मुद्दे डॉक्टरांच्या विरोधात आहेत.
संसदीय समितीने दिलेला रिपोर्ट मान्य करायचा का नाही याचा अधिकार सरकारकडे आहे. त्यामुळे 2 एप्रिलपासून सर्व डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बेमुदत संपावर जाणार आहेत. 27 मार्चला हे विधेयक पुन्हा संसदेत चर्चेसाठी सादर केलं जाईल. यानंतर आम्ही पुढचं पाऊल ठरवू.