जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा मंत्र्यांनी घेतला आढावा

0
8

गोंदिया,दि.२७: गोंदिया जिल्ह्यात यावेळी पडलेल्या अल्प पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये जानेवारी महिन्यातच पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. त्यातच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेजयल योजनेच्या निविदा प्रकरणात केलेल्या हयगईमुळे ४० कोटीच्य ायोजना रखडल्या गेल्या. श
त्या पाश्र्वभुमीवर गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन लक्ष वेधले होते. त्यावर पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारला आढावा बैठक घेण्याची घोषणा केली होती. त्यानुसार २६ मार्च रोजी पाणीपुरवठा मंत्री यांच्या दालनात गोंदिया जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ४३ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले असून जिल्हा परिषदेच्यावतीने ३७ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली. सोबतच गोंदिया जिल्ह्यात भुजल सर्वेक्षण अधिकारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे आमदारांनी लक्षात आणून दिले. त्यावर मंत्री लोणीकर यांनी जिल्हाधिकाèयांना भुजल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहा. तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले, गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी व पाणी पुरवठा यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.