संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
8

गोंदिया,दि.२८ : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सन्मान महामोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र संभाजी भिडे यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा करीत शिवप्रतिष्ठानने अपरजिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्यामार्फत शासनाला पाठविलेल्या निवेदनाव्दारे लक्ष वेधले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार केलेल्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी मोर्चात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे जिल्हाप्रमुख दुर्गेश रहांगडालेसह पदाधिकारी आदी सहभागी झाले होते.