भगवान महावीर जन्म कल्याणक त्रिदिवसीय महोत्सव आजपासून

0
16

गोंदिया दि.२८ः-: सकल जैन समाज गोंदियाद्वारे भगवान महावीर जन्म कल्याणक त्रिदिवशीय महोत्सवाचे आयोजन २७, २८ व २९ मार्च रोजी गोंदिया नगरात करण्यात आले आहे. यात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजता रेलटोलीच्या जैन बेकरीजवळून प्रभातफेरी काढण्यात येईल. दुपारी ११ ते ३ वाजतापर्यंत जैन कुशल भवनात नि:शुल्क रक्तगट, हिमोग्लोबीन तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात येईल. रात्री ८ वाजता अखिल भारतीय कवी संमेलनाचे आयोजन जैन कुशल भवनात करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता हनुमान चौक सिव्हील लाईन्स येथून प्रभातफेरी, सकाळी १०.३० वाजता दिगंबर जैन मंदिरातून शहरातील मुख्य मार्गांनी स्कूटर रॅली व रात्री ८ वाजता महावीर गुंजन मालाचे आयोजन जैन कुशल भवनात करण्यात आले आहे.
२९ मार्च रोजी भगवान महावीर जन्म कल्याण दिवसप्रसंगी सकाळी ७ वाजता दिगंबर जैन मंदिरातून प्रभातफेरी, सकाळी १० वाजता दिगंबर जैन मंदिरातून प्रभू महावीर शोभायात्रा, बालकांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा, दुपारी १२ वाजता दिगंबर जैन भवनात महाभिषेक, १२.३० वाजता स्वामीवात्सल्य जैन कुशल भवनात, दुपारी ३ वाजता भगवान महावीर यांच्या आकृतीवर आधारित ड्रार्इंग स्पर्धा, दुपारी ४ वाजता शासकीय रूग्णालयांमध्ये फळ व बिस्कीट वाटप व रात्री ८ वाजता भगवान महावीर करावके नाईट, सन्मान समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रम होईल. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे राजेश जैन, संजय चोपडा, विपिन बाविसी आदींनी कळविले आहे.