महाराजबागेतील जाई वाघिणीचा मृत्यू

0
11

नागपूर दि.२९::- महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील जाई वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला. मागील सहा महिन्यांपासून ही वाघीण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यात यश आले नाही.आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना 2008 साली चंद्रपूरच्या जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली दहा वर्षे या दोघी महाराजबाग प्राणीसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात झाला होता. जुईच्या मृत्यूनंतर जाई हेच महाराजबागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते.जाईला मूत्रपिंडाचा विकार असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी झाले. त्यातच तिला सापानेही दंश केला होता. त्यातूनही काही काळ ती सावरलीही होती. मात्र, मागील तीन दिवस जाईचे खाणेपिणे खूपच कमी झाले होते. त्यामुळे तिची प्रकृती ढासळली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला.