आदर्श गाव डव्वासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर

0
17
उपसा सिंचन योजनेला मंजुरीःमाजी आ. राजेंद्र जैन यांच्या पाठपुराव्याला यश
गोंदिया,दि.29 : तत्कालीन विधानसभा सदस्य राजेंद्र जैन यांनी विधान परिषद सदस्य असताना शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजने अंतर्गत डव्वा या गावाला दत्तक घेतले होते. शासन निर्णयानुसार त्यांनी शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे असंख्य कामे प्रस्तावित केली होती. त्या कामांचा पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सातत्याने केला. त्याला यश आले असून डव्वा या गावात सुमारे ५० लाख रुपयांच्या खर्चाची शासकीय पशु वैद्यकीय दवाखान्याची इमारत मंजूर करण्यात आली आहे. सुमारे ५५ लाख रुपये खर्चाची उपसासिंचन योजना सुद्धा मंजूर झाली आहे. या शिवाय अभ्यासिका, नाट्यगृह, शाळा खोली व रस्ते अशी अनेक कामे झालेली आहेत.
राजेंद्र जैन हे विधान परिषद सदस्य असताना त्यांनी शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत डव्वा या गावाची निवड केली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या उपस्थितीत डव्वा येथे सर्व प्रमुख विभागांच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी विविध कामे प्रस्तावित केली होती. डव्वा येथे राज्य शासनाच्या अखत्यारितील पशु वैद्यकीय दवाखाना असून इमारत मोडकळीस आली असल्याने नवीन दवाखान्याचे बांधकाम, डव्वा जवळून वाहत असलेल्या नदीवर मानीन घाटाजवळ उपसासिंचन योजना, एक अभ्यासिका, डव्वा गावातील अंतर्गत रस्ते, शाळा इमारत, डिजीटल शाळा अशी विविध कामे प्रस्तावित केली होती व स्वत: ३ मार्च २०१६ रोजी सर्व विभागांना पत्र लिहून प्राधान्याने कामांना मंजुरी प्रदान करावी, असे निर्देश दिले होते.
या संपूर्ण विषयाचा पाठपुरावा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी सातत्याने केला. त्यामुळे १८ लाख रुपयांच्या गावातील अंतर्गत रस्ते, ५ लाख रुपयांचे रंगमंच, ५ लाख रुपये जिल्हा परिषद शाळा इमारत, ८ लाख रुपये अभ्यासिका ही सर्व कामे मंजूर झाली आहे. त्यांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. तसेच सुमारे ५० लक्ष रुपये खर्चाची पशु वैद्यकीय दवाखान्याची इमारत व ५५ लक्ष रुपये खर्चाची उपसासिंचन योजना मंजूर झाली आहे. या दोन्ही योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदार निश्चित झालेले आहे. लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. या शिवाय जि.प. सदस्य परशुरामकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळेला लागून असलेल्या टाकीच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. तसेच डव्वा या आदिवासी परिसरात स्पर्धा परीक्षेच्या पुस्तका उपलब्ध नसल्याने ८ लाख रुपये खर्च करून जी अभ्यासिका बांधकाम करण्यात आलेली आहे, त्यात जिल्हा परिषद स्थानिक विकास निधीतून १ लाख रुपयांच्या स्पर्धा परीक्षेचे पुस्तिका परशुरामकर यांनी मंजूर करून घेतले आहेत. ही संपूर्ण कामे मंजूर झाली त्यामुळे सरपंच पुष्पमाला बडोले, त्रिलोकचंद जैन, राजू (काका) जैन, किसान आघाडीचे महासचिव एफ.आर.टी. शाह, ग्रामपंचायत सदस्य सचिन रहांगडाले, नाशिक बन्सोड, हिरालाल राऊत, श्याम येवले, मुन्ना अग्रवाल, शालिंद्र कापगते, डॉ. सोहन चौधरी, रुपविलास कुरसुंगे, निलू येवले, राकेश जैन, अनिल फरदे याशिवाय गावातील नागरिकांनी माजी आमदार जैन व जि.प. सदस्य परशुरामकर यांचे आभार व्यक्त केले आहेत.