प्रयोगशाळा कर्मचार्यांनी शिक्षकेतर संघटनेला बळी पडू नये-भरत जगताप 

0
36
गोरेगाव,दि.29 : सातवा वेतन आयोग व कर्मचाºयांच्या समस्या, मागण्या, त्रृटीला घेऊन अनेक संघटना आपल्या पदाच्या फायद्यासाठी इतर कर्मचाºयांना हाताशी घेऊन आपली पोळी शेकण्याचे काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रात अनेक संघटना कार्यरत आहेत. यातील शिक्षकेतर संघटनेद्वारे राज्यातील प्रयोगशाळा कर्मचाºयांना भूलथापा देऊन आपला मान व आर्थिक लाभ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रयोगशाळा कर्मचाºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ सक्षम आहे. म्हणून प्रयोगशाळा कर्मचाºयांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन म.रा. शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष भरत जगताप यांनी केले.
राज्यातील शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या अनेक मागण्या व समस्या चौथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित आहेत. प्रयोगशळा साहाय्यक व परिचर अनेक विभागात कार्यरत आहे. त्यांच्या वेतन व अनेक समस्या शासनस्तरावरून मार्गी लावण्यात आल्या आहेत. पण शैक्षणिक प्रयोगशाळा साहाय्यक व परिचरांना जोखीमपूर्ण काम करून सुद्धा वेतनामध्ये तफावत करण्यात आली आहे. प्रयोगशाळा कर्मचारी शिक्षकेत्तर संघटनेमध्ये असताना त्यांच्या मागण्या व समस्यांचा कधी विचारच करण्यात आला नाही. लिपीक वर्गाने फक्त आपल्याच मागच्या मंजूर करून घेतल्या. त्यामुळे नाईलाजास्तव प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची स्थापना करण्यात आली. प्रयोगशाळा कर्मचाºयांच्या अनेक समस्या शासनस्तरावरून मान्य करण्यात आल्या व त्याचा लाभ आज कर्मचाºयांना होत आहे. पण वेतनाचा प्रश्न गंभीर असूनसुद्धा त्यावर विचार करण्यात आला नाही. तसेच प्रयोगशाळा परिचराचे पद रद्द करण्यासाठी शिक्षकेतर संघटनेच्या पाठपुराव्यानुसार २००५ ला पद व्यपगत करण्यात आले. ही आकृतीबंधाची मोठी कार्यवाही होती. प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाने याचा मोठा विरोध करून अनेक आंदोलने केली व उच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्टे आणला व पदाचे रक्षण केले.
सध्या शिक्षकेतर कर्मचारी संघटना १२ वर्षे वरिष्ठ श्रेणी व २३ वर्षांची कालबद्ध पदोन्नतीचा मुद्दा घेऊन प्रयोगशाळा कर्मचाºयांना आपल्या फासात अडकविण्याच्या प्रयत्नात राज्यभर काम करीत आहे. यापूर्वीही असेच कारस्थान रचून स्वत:चा ग्रेड पे वाढवून घेतला व इतरांना त्याचा लाभ मिळू दिला नाही. प्रयोगशाळा कर्मचाºयांना आतापर्यंत कुठलाही लाभ मिळू न देणारे फक्त आपल्या लाभासाठी काम करतात. शिक्षकेत्तर संघटनेत आजिवन झटणारे व काम करणारे नाईक, परिचर, चौकीदार यांना किती लाभ मिळवून दिला तर नाईकपदाचे खच्चीकरण, परिचरांची पदे कमी झाली. त्यासाठी कधीच आवाज न उठवणारे आपल्या पदाव्यतिरिक्त कुणाचेच भले करू शकत नाही. प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यभरातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की, आपल्या महासंघाच्या व्यतिरिक्त कुठल्याही संघटनेशी आर्थिक व कागदोपत्री व्यवहार करू नये, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.